ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी

ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पक्षाचे

अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली आहे.

Related News

या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरते संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जी बसू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.

फोटोशॉपने बनावट सातबारा, नोंदी वाढवणे, खरी शेतकरी वगळणे, अशा गंभीर प्रकारांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही,

असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे निखिल गावंडे यांनी केला आहे.

ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, ज्वारी न पेरलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने खरेदी दाखवून शासनाच्या हमीभाव

योजनेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. रामेश्वर साबळे यांच्यासारख्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांकडे कमी भावाने ज्वारी विकावी लागली.

या प्रकरणावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आवाज उठवला

आणि मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांनी सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय हेतूने प्रेरित प्रकरण असल्याचा दावा केला आहे.

मात्र, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरीहितवादी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वावर फसवणुकीचे आरोप होणं,

ही पक्षाच्या प्रतिमेसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/buldhana-jilaha-rugnalayat-natewaikamidhye-tufan-hanamari-security-raised-questions/

Related News