तीन विक्रमांसह कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एकाच सामन्यात 3 विक्रम आणि कोहलीचा रेकॉर्ड मोडला!

26 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप 2025 सामन्यात श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज पाथुम निसंका याने ऐतिहासिक खेळी करत तीन मोठे विक्रम मोडले. विशेष म्हणजे, त्याने या सामन्यात विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला असून क्रिकेटविश्वात त्याच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. पाथुम निसंकाने भारताविरुद्ध 58 चेंडूत 107 धावा ठोकल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीत 6 षटकार आणि 7 चौकार सामील होते. 184.48 चा स्ट्राइक रेट राखत त्याने आपली खेळी संस्मरणीय केली.

T20 आशिया कप 2025 मध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा चौथा श्रीलंकन खेळाडू बनला.

आपली टीम हरल्यानंतरही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवणारा आशिया कप 2025 मधील पहिला खेळाडू ठरला.

पाथुम निसंकाने T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावांचा विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.

विराट कोहली – 10 सामन्यात 429 धावा (1 शतक, 3 अर्धशतके)

पाथुम निसंका – 12 सामन्यात 434 धावा (1 शतक, 4 अर्धशतके)

या कामगिरीमुळे पाथुम निसंका आता T20 आशिया कपमध्ये शतक झळकवणारा तिसरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा पराक्रम विराट कोहली आणि बाबर हयात (हॉन्गकॉन्ग) यांनी केला होता.पाथुम निसंकाची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याचे वडील ग्राऊंड बॉय, तर आई मंदिराबाहेर फुलं विकायची. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही निसंकाने आपल्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर श्रीलंका क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आज निसंका श्रीलंकन क्रिकेटचा स्टार चेहरा ठरला आहे. त्याच्या या विक्रमी खेळीमुळे त्याच्या यशामागील संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/me-konatach-dharma-maanat-nahi/