श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हरवानजवळ दचिगामच्या जंगलात भारतीय लष्कराने मोठं ऑपरेशन राबवत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा ठार झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर ही कारवाई करण्यात आली.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसा हा पाकिस्तानाशी संबंधित
दहशतवादी संघटनेशी जोडलेला होता आणि अनेक हल्ल्यांमध्ये सक्रिय होता.
या चकमकीनंतर भारतीय लष्कराने एक मोठं दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केलं आहे.
ऑपरेशन दरम्यान लष्कराचं विशेष दल अत्यंत धाडसी पद्धतीने सहभागी झालं होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/chelka-yehethe-shetakyanchaya-bandhawar-experience-watp/