हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष

 

 

 

मुंबई : भारतीय संस्कृतीत नेहमी जेवण हे थोडे जास्तीचे बनवले जाते, जेणेकरून कोणालाही ते कमी पडू नये. पोटात दोन घास जास्तीचे गेले तरी चालतील पण कमी पडायला नको अशी लोकांची धारणा असता, ज्यामुळे बऱ्याचदा घराघरात बनवलेले जेवण हे थोडे का होईना पण उरतेच. हे उरलेले जेवण आपण फेकून न देता ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. आता हा प्रकार जवळजवळ सर्वांच्या घरात सुरु असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जेवण पुन्हा गरम केल्यानंतर त्यातील पोषक घटकांमध्ये बदल होतो आणि हे घटक विषारी बनतात.

जेवण पुन्हा गरम करून खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे पोटदुखी, उलट्या, विषबाधा, आणि इतर आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणते असे पदार्थ आहेत, जे कधीही पुन्हा गरम करून खाऊ नयेत याविषयी जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. आज तुम्हाला रोज आहारात समावेश केल्या जणाऱ्या अशा काही अन्न पदार्थांविषयी सांगत आहोत जे पुन्हा गरम करताच विषारी बनतात. चला तर मग यात नक्की कोणकोणते पदार्थ सामील आहेत ते जाणून घेऊयात.

 

बटाटे पुन्हा गरम केल्यानंतर त्यातील स्टार्च खराब होऊन जातो, ज्यामुळे बटाट्यातील पोषक घटक कमी होऊन ते त्यातून विषारी घटक तयार होऊ लागतात. या कारणामुळे बटाटे उरले असतील त्यांना थंडच खावे किंवा योग्य तापमानावरच गरम करावेत. बटाट्यांमधील बदललेल्या स्टार्चमुळे ते पचायला कठीण होतात.
अंडी ही प्रथिनांनी समृद्ध आहेत. अनेकजण आपल्या डाएट रुटीनमध्ये यांचा समावेश करत असतात. मात्र अंडी पुन्हा गरम केल्यांनतर त्यातील पोषक घटक विघटन पावतात आणि विषारी घटक तयार होऊ लागतात. यामुळे पोटदुखी आणि अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अंडी कधीही थंड अवस्थेत खाणे योग्य असते.
चिकन-मटणमध्ये ठासून प्रोटीन भरलेले असते मात्र यांना पुन्हा गरम करून खाल्ल्याने यातील बॅक्टेरिया वाढू लागतात. असे पुन्हा गरम केलेले चिकन चवीलाही विचित्र लागते. यामुळे फूड पॉयझनिंग होऊन पोटात गडबड होऊ शकते. यामुळे जुलाब आणि उलट्या देखील होऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ नेहमी ताजेच खावेत.