पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.
सोमवारी सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज मंगळवारी
पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण केले.
Related News
यावेळी बोलताना मोदी म्हणाले,
“गेल्या दहा वर्षांत मी सहाव्यांदा रशियाला आलो आहे
आणि या वर्षांत आम्ही 17 वेळा एकमेकांना भेटलो आहोत.
या सर्व बैठका विश्वास आणि आदर वाढविणाऱ्या होत्या.
जेव्हा रशिया-युक्रेन युद्धात विद्यार्थी अडकले होते,
तेव्हा पुतिन यांनी त्यांना भारतात परत पाठवण्यात मदत केली.
त्याबद्दल मी रशियाचे लोक आणि माझे मित्र पुतीन यांचेही आभार व्यक्त करतो.
“रशिया आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील आमची मैत्री अतूट आहे
आणि त्यामुळे ‘ये अमर प्रेम की कहानी है’ ” असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
‘आव्हानांना आव्हान देणं माझ्या डीएनएमध्ये’
पंतप्रधान म्हणाले, ‘सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि जागतिक दर्जाच्या
पायाभूत सुविधांमुळे जगाच्या विकासाचा अध्याय लिहिला जाईल.
आज जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 15 टक्के आहे
आणि आगामी काळात हे प्रमाण वाढेल.
जागतिक गरिबीपासून ते हवामान बदलापर्यंत,
भारत प्रत्येक आव्हानाला तोंड देईल आणि आव्हान पेलणे माझ्या डीएनएमध्ये आहे.
‘जो विचार नेत्याच्या मनात असतो आणि तोच विचार लोकांच्या मनात असतो,
त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि हेच मी पाहतोय.
जागतिक समृद्धीसाठी भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालत आहेत.
येथे उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण भारत आणि रशिया यांच्यातील
संबंधांना नवी उंची देत आहात.
मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
‘मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध आणला आहे.
मी माझ्यासोबत 140 कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलो आहे.
तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर माझा भारतीय समुदायाशी पहिला संवाद
इथे मॉस्कोमध्ये होत आहे, हे अतिशय आनंददायी आहे.”
“आज शपथ घेऊन एक महिना झाला.
आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी, 9 जून रोजी मी तिसऱ्यांदा
भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकदीने काम करेन, असेही मोदी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/the-tigers-eyes-are-not-chhatrapati-shivaji-maharajs/