आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले
आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
मोडवर आले आहे. गेल्या महिन्याभरापासून अजित पवार हे
जनसन्मान यात्रेत व्यस्त आहेत. त्यातच आता अजित पवारांनी
एक मोठं वक्तव्य केले आहे. “दुसरा आमदार मिळाला तर
दोघांच्या कामाची तुलना करा. यंदाची निवडणूक बारामतीकरांच्या
भवितव्याची”, असे अजित पवारांनी म्हटले.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या बारामतीत आहे.
यानिमित्ताने अजित पवारांनी दणदणीत भाषण केले. या
भाषणावेळी अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकांबद्दल एक मोठं
वक्तव्य केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा घेतला.
“पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका
घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ
आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा”,
असा सल्लाही अजित पवारांनी दिला.
“तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना
सांगा. घड्याळाने ही कामे केली सांगा. आपण आपल्या टर्मपुरती
कामं केलेली त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. ही निवडणूक
महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आणि बारामतीकरांच्या भवितव्याची
निवडणूक आहे. पाच वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे परिणाम होणार
आहे त्याची निवडणूक आहे. आपण सत्तेत असू तर काही करता
येणार आहे”, असेही अजित पवार म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/like-many-things-lalbaghcha-rajahi/