मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात लाडक्या बहीणींनी घातला गोंधळ

यवतमाळच्या

यवतमाळच्या वचनपूर्ती सोहळ्यातील प्रकार   

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज

यवतमाळच्या किन्ही मैदानात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला

Related News

प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला.

मात्र या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी गोंधळ घातल्याची

माहिती पुढे आली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दिग्रस

तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी समाजाच्या महिला चांगल्याच

आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सगळ्यांचे

  लक्ष वेधले. दिग्रस येथील ठाणेदार यांच्या बदलीच्या मागणीसाठी

या महिला आक्रमक झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही काळ

या कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी, पोलिसांनी

वेळीच हस्तक्षेप करत या महिलांना बाहेर काढलं आणि त्यांची समजूत काढली.

मात्र या कृत्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

यांच्या उपस्थिती माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला.

महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम अंतर्गत लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री

आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सवांद साधला. यावेळी जवळपास 30 हजार

महिला या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.

Read also: https://ajinkyabharat.com/jalanyatil-industrial-industrial-steel-company-explosion/

Related News