जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ

मृतदेह

धनेगाव शेत शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

घटनास्थळी पोलीस दाखल पुढील तपास सुरू

बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील शेतशिवारात 20 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रमोद लांडे (धनेगाव) यांच्या शेतात काही मजूर कामासाठी आले असता त्यांना अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आला. तात्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.सूचना मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Related News

तपासादरम्यान महिलेच्या अंगावरचे कपडे जळलेल्या अवस्थेत असून, मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळून आला.या गंभीर प्रकरणाची माहिती ठाणेदार झोडगे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी यांना दिली. माहिती मिळताच रेड्डी साहेबांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई बाळापूर पोलीस करीत आहे. अजिंक्य भारत न्युज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ.

read also : https://ajinkyabharat.com/surya-kumar-yadav-captaincy-7-explosive-reasons-maajhya-captainpadala-nahi-bhi-skys-powerful-statement-created-a-stir/

Related News