दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी

भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले

असल्याची ऑनलाइन तक्रार करून आली होती.

Related News

मात्र या परिसरातील त्यांच्या मागिल शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेल्या

लोकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून ठेवण्यात आला आहे काही

शेतकऱ्यांच्या जवळून १ एक्कर ५०० रूपये प्रति पैसे घेऊन खोट्या क्षेत्रात जाऊन सर्वे केला आहे.

मात्र यामध्ये अकोला जिल्हा कृषी अधिकारी, तथा तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे कर्मचारी यांनी

लाखो रुपये लुबाडणूक करून खोटे सर्वे केले आहेत त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात

यावी व ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांचे अजुनही सर्वे करण्यात आले

नाहीत त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून पिक विमा कंपनीच्या हल्ग्जिपणामुळे

वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा.

कारंजा (रम) येथील शेतकरी यांनी वारंवार अकोला येथील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून असलेले

अधिकारी महल्ले साहेब यांच्या कडे फोन द्वारे संपर्क साधला असता संबंधित

विमा कंपनीच्या कर्मचारी यांना सर्वे करण्यासाठी पाठवतो मात्र संबंधित

विमा कंपनीने वरिष्ठ अधिकारी आले ना कर्मचारी आले आहेत त्यामुळे माझ्या शेतातील

सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आलेल्या पावसामुळे सोयाबीन

पिकाचे नुकसान झाल्यास सर्व नुकसान पिक विमा

कंपनीच्या माध्यमातून भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली आहे

Related News