स्मार्टफोन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कम्प्युटरची कामं देखील या छोट्याश्या डिवाइसवर होत असल्यामुळे युजर्स नेट बँकिंग सारखी कामे देखील मोबाइलवर करत आहेत. त्यामुळे फोनमध्ये तुमची पर्सनल माहिती तर असतेच त्याचबरोबर बॅकिंग सर्व्हिस देखील असते. परंतु आता दिग्गज स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो बद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यात कीबोर्डच्या स्ट्रोकवरून फोनमधील बँकिंग आणि सोशल मीडिया पासवर्ड चोरले जात आहेत.
अशी होत आहे युजर्सच्या पासवर्डची चोरी
जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवरून बॅकिंग पेमेंट किंवा सोशल मीडिया अॅप लॉगिन करता त्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. परंतु काही खास कीबोर्ड बनवले जात आहेत, ज्यांच्या माध्यमातून ओळखलं जातं की तुम्ही कोणता लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकला आहे. यात कीबोर्ड स्ट्रोक रजिस्टर होतात. सिटिजन लॅबच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये अनेक कीबोर्ड अॅप्सची नावे समोर आली आहेत, ज्यात सिक्योरिटी रिस्क आहे. तसेच दावा करण्यात आला आहे की हे अॅप्स कीस्ट्रोक्स लीक करू शकतात. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या कीबोर्ड अॅप्सचा वापर सॅमसंग, शाओमी सारखे स्मार्टफोनमध्ये देखील करण्यात येत आहे.
कोणत्या कीबोर्ड अॅप्सचा वापर ठरू शकतो धोकादायक
- सॅमसंग कीबोर्ड
- Xiaomi वरील Baidu, iFlytek आणि Sogou की-बोर्ड
- विवो आणि ओप्पोचे सोगो आईएमे कीबोर्ड
- Honor मधील Baidu IME कीबोर्ड
रिपोर्टनुसार अशाप्रकारचे कीबोर्ड अॅप्स मोठयाप्रमाणात चीनमध्ये वापरले जातात, जे कीबोर्ड स्ट्रोक सर्वर मध्येस्टोर करतात. या कीबोर्ड स्ट्रोकच्या डेटामध्ये कोणत्या अॅप किंवा वेबसाइटवर कोणते कीज वापरले गेले याची माहिती असते. या माहितीवरून सोशल मीडिया आणि बँकिंग डिटेल्स सहज वेगळी जरा येतात.
Related News
कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
मात्र आज (४ एप्रिल) तापम...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
रिपोर्टनुसार, या सुरक्षा त्रुटींमुळे जगभरातील अब्जावधी युजर्सवर परिणाम होऊ शकतो. क्लाउड-आधारित कीबोर्ड फीचर्स वापरणाऱ्यांना सर्वाधिक धोका असतो, जे प्रिडेकटिबल मजकूर फिचरसाठी सर्व्हरवर डेटा पाठवतात.
यावर उपाय काय
- सतत तुमचं कीबोर्ड अॅप अपडेट करत राहा.
- अश्या कीबोर्ड अॅप्सचा वापर करा, जे स्ट्रोक डेटा डिव्हाइसवर ठेवतात.