नीता अंबानींना टक्कर देणारी महिला शेवटी जन्माला आलीच..!

सुधा रेड्डी

Nita Ambani आपल्या ब्युटी आणि लूकमुळे दररोज चर्चेत असतात. त्या आता 60 वर्षांच्या आहेत पण त्यांच्या चेहऱ्याची चमक आणि फिटनेस पाहता त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

या सौंदर्यवती महिलेने बॉलीवूडच्या अनेक तरुण अभिनेत्रींना आपल्या स्टायलिश लूकने मात दिली आहे,

पण नीता अंबानी यांना टक्कर कोण देत असेल बरं? तर त्या आहेत बिझनेसवुमन Sudha Reddy ज्यांची स्टाईल लाजवाब असते. सुधाचा सोशल मीडिया तिच्या ग्लॅमर फोटोंनी भरलेला आहे.

Related News

ज्यात तिची किलर स्टाईल सगळ्यांच्या नजरा खेचून घेते.

45 वर्षीय सुधा एक फिलेंथरोपिस्ट असून समाजसेवेत खूप सक्रिय आहे. तिने अब्जाधीश उद्योगपती पीव्ही कृष्णा रेड्डीसोबत लग्न केले आहे.

ती Megha Engineering and Infrastructure Limited (MEIL) ची संचालक आहे आणि 2019 मध्ये मेट गालामध्ये सहभागी होणारी एकमेव भारतीय होण्याचा मान तिच्या नावावर आहे.

सुधाची करोडो रुपयांची संपत्ती तिच्या कपड्यांपासून तिच्या दागिन्यांमध्ये स्पष्टपणे दिसते.

काशिदा एम्ब्रॉयडरी साडी

सुधा अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामध्ये तिचे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही लुक कमाल असतात .

विश्वास बसत नसेल तर तिचा हा लुक तुम्ही स्वतःच बघा. यामध्ये ती डिझायनर तरुण ताहिलियानीच्या काशिदा एम्ब्रॉयडरी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

ज्याची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे. ही मल्टी पैस्ले जॉर्जेट साडी सिक्वीन्स, कुंदन आणि गोटासह डिझाइन केलेली आहे आणि सिल्क डुपियन एम्ब्रॉयडरी ब्लाउजसह जोडलेली आहे.

भगवान कृष्णाचे सोन्याचे लॉकेट आणि मोकळ्या केसांसह सुधाने हा लूक स्टाईल केला आहे.

आयव्हरी गाऊन

सुधाही वेस्टर्न लूकमध्ये छान दिसते. या लुकमध्ये तिने ती प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाचा सॅटिन आयव्हरी गाऊन परिधान केला आहे.

ज्याच्या सहाय्याने सॉफ्ट ऑर्गेन्झाचा बुरखा स्टाईल करण्यात आला आहे. हा स्वीटहार्ट नेकलाइन गाऊन कंबरेपर्यंत बॉडी हगिंग आहे, तळाशी फ्लेअर्स आहे.

ज्यामध्ये मधून मधून कट्स आहेत. फुलांच्या डिझाईनसारखे हे फ्लेअर गाऊनचे सौंदर्य वाढवत आहेत.

सुधाने हा लूक डायमंड नेकलेस आणि अंगठ्याने पूर्ण केला.

तिने तिच्या केसांना वेव्ही कर्ल दिले आणि आणि त्यांना पिन केले. पण, या लूकमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतली तिच्या ब्लॅक अँड व्हाईट चेस बोर्ड प्रिंट बॅगने, जी लुक अधिक खुलवत होती.

कांजीवरम साडी

मंदिरात जाताना सुधा तिच्या आउटफिटची विशेष काळजी घेते. तिरुपती बालाजी मंदिराला भेट देण्यासाठी सुधाने डिझायनर गौरांग शाह यांच्या कलेक्शनमधून कांजीवरम साड्या निवडल्या होत्या.

ज्यामध्ये तिने कुंदन नेकलेससह सोनेरी रंगाची साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी आणि हिरव्या रंगाचे स्टोन्स होते.

तसेच नोज रिंग स्टाइल केली होती. यासोबतच सुधाने तिच्या दुसऱ्या लूकमध्ये महाराष्ट्रीयन नोज रिंग आणि हाफ मून बिंदी घातली होती. ज्यामध्ये ती मराठी मुलीसारखी दिसत होती.

गोल्डन गाऊन

हा गोल्डन गाऊनही नीता लुल्ला यांनी डिझाइन केला आहे. ज्याच्या ऑफ शोल्डर चोळीसह दोन्ही बाजूंनी नेटची ट्रेल सोडली होती.

या ट्रेलवर स्टार्स होते, तर गाऊनचे डिटेलिंग सोनेरी पंखांनी केले होते. सुधाने ब्लॅक नी लेन्थ बूटांसह ते स्टाइल केले.

तिने गोल्डन मॅचिंग बॅग, डायमंड कानातले आणि स्नेक स्टाईल रेड रिंग देखील कॅरी केली होती.

फ्लोरल प्रिंट साडी

फ्लोरल प्रिंटने सजवलेल्या या साडीमध्ये सुधाचा समर फ्रेंडली लूक अप्रतिम आहे.

या साडीला गुलाबी बॉर्डर असते आणि शेवटी पांढऱ्या कापडाने बनवलेले छोटे बीट्स असतात.


साडीवर लाल गुलाबाच्या वेली आहेत. यासोबत तिने डायमंड नेकलेस कॅरी केला आहे. ज्याच्या मध्यभागी लाल पाचूचा दगड आहे.

तिने मॅचिंग डायमंड कानातले देखील स्टाईल केले.

स्लीक बनमधला गजरा तिचा लुक अधिक खुलवताना दिसत होता.

Related News