चिनी स्मार्टफोन निर्माता विवोनं आपल्या लोकप्रिय V-सीरीजमध्ये एका नव्या हँडसेटचा समावेश केला आहे. कंपनीनं सेल्फी सेंट्रिक Vivo V30e भारतात आणला आहे. याची खासियत म्हणजे 5500mAh बॅटरी असलेला जा भारतातील सर्वात पातळ फोन आहे. याच्या बॅक पॅनलवर ऑरा लाइटसह 50MP Sony IMX882 मेन कॅमेरा OIS सपोर्टसह मिळतो. फोनमधील फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात.
Vivo V30eची किंमत
नवीन डिवाइस कंपनीनं स्टाइलिश डिजाइनसह सादर केला आहे आणि यात अल्ट्रा-स्लिम ३डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लग्जरी डिजाइनसह दोन कलर ऑप्शंस-व्हेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये आला आहे. याच्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे. तर ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसाठी २९,९९९ रुपये मोजावे लागतील.
Vivo V30e ची विक्री ९ मे २०२४ पासून सुरु होईल. हा फोन कंपनी वेबसाइट आणि पार्टनर रीटेल स्टोर्स व्यतिरिक्त ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येईल. या डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे आणि खास डिस्काउंट किंवा ऑफर्सचा फायदा देखील मिळत आहे. ऑफलाइन स्टोर्सवर ICICI, SBI, IndusInd, IDFC आणि अन्य बँक कार्ड्सनी पेमेंट केल्यास १० टक्क्यांची सूट मिळत आहे.
Related News
Vivo V30eचे स्पेसिफिकेशन्स
नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा ३डी कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले हाय-रिफ्रेश रेटला सपोर्टसह देण्यात आला आहे. याची जाडी फक्त ७.६५मिमी आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर मिळतो. विवो फोन अँड्रॉइड १४ आधारित फन टच ओएस १४ वर चालतो. कंपनी या फोनला तीन मोठे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्ष सिक्योरिटी अपडेट्स देणार आहे.
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५५००एमएएचची मोठी बॅटरी मिळते. हा फोन ४४वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 50MP OIS Sony IMX 882 प्रायमरी सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप स्टूडियो क्वॉलिटी ऑरा लाइटसह मिळतो. यात ५०एमपी आय-ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या डिवाइसची मॅन्युफॅक्चरिंग विवो इंडियाच्या ग्रेटर नोयडा मधील फॅक्टरीमध्ये केली जात आहे.