बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ

डिजीटल मार्केटींग ॲप तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या

उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी

Related News

आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे.

शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील

मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी.

ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत

उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यात सुमारे ७ लाख ८२ हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत

सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार

आणि शहरी ६५ हजार असे बचत गट कार्यरत आहेत.

महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना

स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा.

मोकळ्या जागा, मैदाने याठिकाणी काही दिवसांकरीता स्टॉलची उभारणी

करून देण्यात यावी. जेणेकरून याठिकाणी हक्काची बाजारपेठ

या गटांना मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read also: https://ajinkyabharat.com/atal-bridge-woman-cab-driver-who-attempted-suicide-sacrificed-his-life%e0%a4%85%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b9/

Related News