राष्ट्रवादीने महायुतीत ‘इतक्या’ जागांवर केला दावा!

विधानसभा

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली

आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत

आहे. महायुतीत अजित पवार गट किती जागांवर लढणार? याची

Related News

चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा

सांगितला आहे. आमचे जे कारभारी आहेत. अजितदादा पवार,

प्रफुल पटेल, सुनील तटकरे त्यांना माहिती आहे की जागावाटपाची

चर्चा कुठपर्यंत आली आहे ते. मी काही त्या चर्चेमध्ये जास्त लक्ष घालत

नाही. मला काही जास्त माहिती नाही. पण अजित पवारांनी महायुतीत

80 ते 90 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या किती मिळणार? किती

निकाल येतो, मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.

प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला

माहिती नाही. महायुती सरकाराने जे कार्यक्रम सुरु केले. आश्वासन नाही,

घोषणा नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना

सोलर पंप विज आणि वीज माफ असेल. विद्यार्थ्यांना स्टाईपेन, मुलींना

मोफत शिक्षणाचे असेल या योजना सुरु झाल्या. आम्ही आश्वासने

दिली नाही. पेन्शन योजनेमध्ये सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे.

त्यासाठी दोन-तीन पर्याय शोधण्यात आले आहेत. पर्याय त्यांना मान्य

असेल तो पर्याय त्यांना स्वीकारण्याची मुभा देण्यात आली, असं छगन

भुजबळ म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/aapchi-meeting-at-arvind-kejriwals-residence/

Related News