पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेली अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत

खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरवाढीवरून सन्मानजनक तोडगा निघालेला नसल्याने आजपासून बाजार

प्रशासनाने व्यवहार पूर्णतः बंद ठेवले आहेत. या वादामुळे बाजार समितीतील खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार असून

Related News

शेतकऱ्यांनी तोडगा निघेपर्यंत शेतमाल विक्रीस आणू नये, असे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे.

या बंदचा शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. कामगार व खरेदीदारांमध्ये तोडगा न निघाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

सध्या बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालाची मोठी आवक सुरु झालेली होती. अशातच बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

यामुळे बाजार समितीसह शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. तोडगा निघेपर्यंत कुणीही माल आणू नये असे जाहीर करण्यात आलेले आहे.

कामगार आपल्या मागणीवर ठाम असून खरेदीदार वाढीव दराबाबत सकारात्मक नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

या संदर्भात बैठका घेत तोडगा काढण्याचे प्रयत्नही झाले. परंतु अद्याप हा विषय सुटला नसल्याने कोट्यवधींची उलाढाल

असलेल्या बाजार समितीच्या यार्डामध्ये आज शुकशुकाट बघायला मिळाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/thanedar-deepak-vares-visit-to-siddheshwar-vidyalaya-hatola/

Related News