मान्यात अतिक्रमण धारकांच्या घरावर चालला बुलडोझर

अकोला जिल्ह्यातील माना येथील जुना पूल प्लॉट येथील

अतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे माना

ग्रामपंचायतने बुलडोझर चालवला असून अनेकांचे संसार हे

Related News

उघड्यावर पडले आहेत. जवळपास 50 वर्षापासून जुना पूल

प्लॉट येथे अतिक्रमणधारक हे वास्तव्य आहे, सदर जागा ही

महाराष्ट्र शासनाची असून काही जागा ही मध्य रेल्वेची आहे.

ही शासकीय जागा काही अतिक्रमणधारकांनी हडप केली

असल्याची प्रशासकीय माहिती समोर आलीय, त्यामुळे अतिक्रम

ण धारकांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांचे अतिक्रमण

स्वतःहून काढण्याचे आदेश दिले होते, मात्र पावसाळ्याचे दिवस

असताना अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण काढले नाही,

शेवटी शासनाने गंभीर पवित्रा घेत पोलीस बंदोबस्तात आणि

माना ग्रामपंचायतच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढले.

Read also: https://ajinkyabharat.com/narayan-rane-chief-minister-eknath-shindenchya-bhetila/

Related News