न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल, आता तलवारऐवजी हातात संविधान

न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होता

आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात

संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात

Related News

आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे

टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च

न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने

वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते.

त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च

न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा

बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच

दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर

दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.

CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून

आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना

समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे

सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी,

तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा

संदेश समाजात जाईल.

Read also: https://ajinkyabharat.com/before-the-elections-were-announced-both-the-big-leaders-were-present/

Related News