आंदोलकांच्या अल्टिमेटमनंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

बांगलादेश

 बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन

यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

ढाका येथील सर्वोच्च न्यायालयाला शनिवारी आंदोलकांनी घेराव घातला.

Related News

यानंतर सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांना दुपारी एक वाजेपर्यंत

राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात

मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारांना सांगितले की, उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि देशभरातील कनिष्ठ न्यायालयांच्या

न्यायाधीशांच्या सुरक्षेचा विचार करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीशही राजीनामा देतील का?

असे विचारले असता सरन्यायाधीश म्हणाले, हा त्यांचा निर्णय आहे.

आंदोलकांनी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास

त्यांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा दिला होता.

शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तेथे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली

नवीन सरकार स्थापन झाले आहे. याठिकाणी पोलिस युनियनने संपाची घोषणा केली असून

जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत कामावर परतण्यास नसल्याचं म्हटलं आहे.

त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/pune-crime-branch-takes-major-action-one-crore-drugs-seized/

Related News