The Ba*ds of Bollywood X Review आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये समीर वानखेडेंचा ट्विस्ट, प्रेक्षक चक्रावले**
मुंबई: शाहरुख खानच्या मुलाने आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ आजपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. ही आर्यनची पहिली दिग्दर्शन केलेली प्रोजेक्ट असून प्रेक्षक आणि टीव्ही/ओटीटी चाहत्यांमध्ये तिची उत्सुकता वाढली आहे.सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी, बॉबी देओल, राघव जुयाल यांसह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. पहिल्या एपिसोडमध्येच ड्रग्ज आणि स्टारकिड्सच्या जगातील वास्तव दाखवले गेले आहे. कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसतसे ट्विस्ट्स प्रेक्षकांना अक्षरश: चक्रावून सोडतात.विशेष आकर्षण ठरलेली भूमिका आहे समीर वानखेडेंची, जी साकारणारा अभिनेता मूळ वानखेडेंसारखा दिसतो. समीर वानखेडे हेच 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील तपासणीसाठी ओळखले गेले होते, ज्यात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामे यांना तात्पुरती अटक झाली होती. या छाप्यात 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते.सोशल मीडियावर पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांनी आर्यनच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. कथानक, ट्विस्ट्स आणि पात्रांची निवड प्रेक्षकांना आवडत आहे, विशेषतः समीर वानखेडेंची भूमिका प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/bharatala-t20-middle-nawa-number-one-golandaz/