बातमी:दिल्लीमध्ये होणाऱ्या रामलीलामध्ये या वर्षी पूनम पांडेच्या एन्ट्रीने वाद निर्माण केला आहे. यंदा नवरात्र आणि रामलीला 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत, परंतु मंदोदरीच्या भूमिकेसाठी पूनम पांडेचे नाव जाहीर होताच हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.इंद्रप्रस्थ विश्व हिंदू परिषदचे दिल्ली राज्य सचिव सुरेंद्र गुप्ता यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसेच, संत दिवाकराचार्यजी महाराज यांनीही म्हटले की, मंदोदरी ही रावणाची पतिव्रता आणि सतीव्रतेत निपुण होती. रावणाने माता सीतेचे हरण केले असतानाही मंदोदरीने त्याला विरोध केला होता. त्यामुळे मंदोदरीची भूमिका साकारणारी व्यक्ती पवित्र मन आणि वर्तनाची असली पाहिजे.पूनम पांडे ही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य, अश्लील व्हिडिओ आणि चर्चेच्या कारणांमुळे प्रसिध्द राहिली आहे. मागील वेळेस तिने स्वतःच्या मृत्यूची अफवा पसरवून वाद उभा केला होता. यावर्षी अभिनेता आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारणार आहे, तर पूनम पांडे त्याची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे.संतांनी लव-कुश रामलीला समितीकडे विनंती केली आहे की, पूनम पांडेला ताबडतोब रामलीलेतून काढून टाकावे, अन्यथा रामलीलेविरुद्ध निषेध आणि आंदोलनांना सामोरे जावे लागू शकते.
read also : https://ajinkyabharat.com/karanja-nagrit-suru-honar-nau-divas-religious-festival/
