या वेळी कारण धक्कादायक!
महापालिकेच्या कार्यालयात काही खासगी अंगरक्षक बंदुका घेऊन खुलेपणाने फिरताना दिसून आले. ही घटना नागरिकांसमोर घडल्याने नियम आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरक्षा रक्षकांवर लाखो रुपये खर्च केले असून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे शेकडो जवान कंत्राटी पद्धतीने तैनात आहेत; तरीही सुरक्षा उपायुक्त वंदना गुळवे यांना नियमांची माहिती नाही, हे उघड झाले.काही महिन्यांपूर्वीच न्यायालयात खासगी अंगरक्षक बंदूक घेऊन फिरत असल्याने 11 पोलिस निलंबित झाले होते. त्यानंतरही महापालिकेत भर दिवसा बंदूकधारी अंगरक्षक दिसणे चिंतेचा विषय आहे.विशेष म्हणजे महापालिकेच्या सुरक्षा विभागात अग्निशस्त्र जमा करण्याचे फलक असूनही, अंगरक्षकांना कोणाचीही भीती दिसली नाही. त्यामुळे “एखादी घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.या प्रकारावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली, “महापालिकेत काही लोक शस्त्र घेऊन आले होते, जणू काही लढायला तयार आहेत. या घटनेवर जितका खेद व्यक्त करावा तितकाच कमी आहे. अशा लोकांना भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.ही घटना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षेच्या कमतरतेचा आणि नियमांवरील दुर्लक्षाचा खुलासा करते, आणि आता नागरिक आणि प्रशासन यांच्यात या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/nabicha-finishing-touch/
