बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला!

विद्यार्थी नेत्यांनी

विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले

बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना

यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारल्याने शनिवारी पुन्हा तणाव निर्माण झाला

Related News

आणि आंदोलकांनी राजधानी ढाक्याच्या मुख्य रस्त्यांना घेराव घातला.

आरक्षणविरोधी आंदोलनात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर

काही दिवसांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

बांगलादेशात अलीकडेच वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी

पोलिस आणि प्रामुख्याने विद्यार्थी आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी पाहायला मिळाल्या.

1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात लढलेल्या माजी सैनिकांच्या नातेवाईकांना

या कोटा प्रणाली अंतर्गत सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले होते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांनी ढाक्याचे प्रमुख रस्ते अडवले,

त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अधिका-यांनी सांगितले की,

शहरातील विविध ठिकाणी आंदोलकांनी रॅली काढल्याने

सुरक्षा दलांना कडक पहारा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शुक्रवारी पंतप्रधान हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमधील

कोटा प्रणालीवरून हिंसाचार संपवण्यासाठी चर्चेसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी

गणभवन येथे भेटण्याचे आवाहन केले होते.

शुक्रवारी पुन्हा निदर्शने सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला आणि

100 हून अधिक जखमी झाले. राजधानी ढाक्याच्या काही भागांमध्ये

2,000 हून अधिक निदर्शक जमले होते, त्यापैकी काहींनी नारे देत पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.

Read also: https://ajinkyabharat.com/resolution-for-change-in-murtijapur-assembly-constituency/

Related News