‘The 50’ मध्ये सीवेट तोमरचा वाद चांगलाच चर्चेत; प्रिन्स नरुलासोबतच्या मतभेदांवर म्हणाला – “जवळच्या व्यक्तीकडून झालेलं विश्वासघातच सर्वात जास्त दुखावतं”
लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो The 50 सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. शोमधील स्पर्धकांमधील टास्क, रणनीती आणि तुफान वादामुळे प्रत्येक भाग चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करताना दिसत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक Siwet Tomar याला शोमधून बाहेर पडावे लागले आणि त्याचवेळी त्याचा Prince Narula याच्यासोबत झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
The 50 शोमधून बाहेर पडल्यावर सीवेट तोमरने आपल्या Instagram अकाउंटवर लाइव्ह येत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याने The 50 शोमधील एक व्हिडिओ शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “POV: विश्वासघात तेव्हाच जास्त दुखावतो, जेव्हा तो आपल्या जवळच्या लोकांकडून होतो.”
याशिवाय त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्येही नाराजी व्यक्त केली. “हा सर्वात मूर्ख निर्णय होता. तुझ्याकडे फक्त एकच प्राधान्य होतं – धोक्याच्या परिस्थितीत उभं राहणं. तरीही तो घरी गेला. वॉव,” अशा शब्दांत त्याने अप्रत्यक्षपणे प्रिन्स नरुलावर टीका केली.
Related News
The 50 शोमधील मैत्रीत पडली फूट
Siwet Tomar आणि Prince Narula यांच्यात शोच्या सुरुवातीपासून चांगली मैत्री दिसत होती. दोघेही एकमेकांना सपोर्ट करताना अनेक वेळा दिसले होते. मात्र या आठवड्यातील एलिमिनेशन राऊंडमध्ये घडलेल्या घटनांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसून आलं.
शोमधील मतदान आणि रणनीतीच्या प्रक्रियेत काही निर्णयांवरून मतभेद झाले आणि त्याचा परिणाम सीवेटच्या एलिमिनेशनमध्ये झाला. त्यामुळे सीवेटला हा निर्णय विश्वासघातासारखा वाटल्याचे त्याच्या पोस्टमधून स्पष्ट झाले.
इतकंच नाही तर या वादानंतर सीवेट तोमरने Prince Narula आणि त्याची पत्नी Yuvika Chaudhary यांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या तिघांमधील समीकरणांवर चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नेहल चुदासामासोबतही मोठा वाद
दरम्यान, शोमध्ये Siwet Tomar आणि Nehal Chudasama यांच्यातही मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एका टास्कदरम्यान दोघांमध्ये जोरदार शब्दयुद्ध झाले.
नेहलने सीवेटवर टीका करत म्हटलं की, “सीवेट गेम हरल्यामुळे दुखावला होता आणि एका साध्या ‘ओये होये’ मुळे तो चिडला. मी कधीही मतांसाठी विनंती केली नाही. मला नेहमी माझ्या कामगिरीमुळे वाचवण्यात आलं आहे, कारण मी एक मजबूत परफॉर्मर आहे.”
तिने पुढे सांगितले की, जेव्हा तिला पहिल्यांदा ‘डेंजर झोन’मध्ये टाकण्यात आले, तेव्हा सीवेटने तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवर ती नाराज झाली होती. त्यावेळी त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न करत “माझ्या डोळ्यांत बघ, मी असं का करेन?” असं सांगत तो फक्त एक रणनीती असल्याचं स्पष्ट केलं होतं.
अलायन्स आणि विश्वासाचा खेळ
नेहल चुदासामाने शोमधील अलायन्सबद्दलही भाष्य केले. तिच्या म्हणण्यानुसार, ती सुरुवातीपासून आपल्या गटाशी प्रामाणिक राहिली. “मी पहिल्या दिवसापासून अलायन्ससाठी कामगिरी, मतदान आणि प्रत्येक निर्णयात साथ दिली. अनेक वेळा त्यांनी माझ्या मतांचा आदर केला नाही, तरीही मी त्यांना सपोर्ट केला,” असे ती म्हणाली.
तिने आणखी एक मुद्दा मांडत सांगितले की, काही वेळा संपूर्ण अलायन्सने तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिला शोमधून बाहेर काढण्याचा विचारही केला. “हा अलायन्सचा खेळ आहे, पण त्यासाठी कुणाची ‘चमची’ बनण्याची गरज नाही,” असा टोला तिने लगावला.
प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली
या सर्व घटनांमुळे The 50 शो अधिकच चर्चेत आला आहे. सीवेट तोमरच्या एलिमिनेशननंतर आणि त्याच्या सोशल मीडिया पोस्टनंतर चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रेक्षक सीवेटच्या बाजूने बोलताना दिसत आहेत, तर काही जण प्रिन्स नरुलाच्या रणनीतीला योग्य ठरवत आहेत.
रिअॅलिटी शोमध्ये मैत्री, अलायन्स आणि गेम स्ट्रॅटेजी यांचा समतोल साधणे किती कठीण असते, याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे. पुढील भागांमध्ये या वादाचा परिणाम इतर स्पर्धकांवर आणि गेमवर कसा होणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
