तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –

तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –

तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य

आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, तेल्हारा येथे ही बैठक संपन्न झाली.

Related News

ही बैठक मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, संपर्क प्रमुख तथा उपनेते

मा. आमदार गोपीकीशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

निवडणूक तयारीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

या बैठकीस निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, उपजिल्हाप्रमुख मनिष कराळे,

जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, अकोला शहर संघटक राजेश पिंजरकर,

युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी (अकोट) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रीरंग पिंजरकार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महायुती सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या

विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना पक्ष करत आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करून कामाला लागावे.”

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश

तालुक्यातील विविध गावांमधून शिवसेनेत पक्ष प्रवेश झाले. हिवरखेडचे दीपक हिवराळे,

दानापूरचे दिनेश विखे, सचिन नांदुरकार यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होणार आहे.

तालुका प्रमुख प्रविण वैष्णव व शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटन बळकटीची प्रक्रिया पार पडली.

कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस प्रकाश पाटील चिकटे (उपतालुकाप्रमुख, बेलखेड सर्कल), आदित्य अग्रवाल

(उपतालुकाप्रमुख, भांबेरी सर्कल), वासुदेव निंबोकार, विक्की वाघ, प्रमोद निळे, रघुनाथ विखे,

किशोर नेरकर, प्रकाश वानखेडे, गोपाल आमले, निखिल हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रविण वैष्णव यांनी केले.

सूत्रसंचालन प्रतिक पखान यांनी केले तर आभारप्रदर्शन शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांनी केले.

 शिवसेना तालुक्यात बळकटपणे उभी असून आगामी निवडणुकांत निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

Read Also : https://ajinkyabharat.com/aligadamidhye-devi-devatanya-chitra-aslelya-napkinavaron-suit/

Related News