तेल्हारा – आईच्या स्मृती दिनानिमित्त भिमराव परघरमोल यांच्या कुटुंबाने विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आणि समाजापुढे एक प्रेरणादायी उपक्रम सादर केला.
भिमराव परघरमोल (व्याख्याता व फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा अभ्यासक, तेल्हारा, जि. अकोला) यांच्या आईंचा अकरावा स्मृतिदिन १९ सप्टेंबर २०२५ रोजी होता. त्यानिमित्त त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तीन शाळांमध्ये साहित्याचे वाटप केले.
नगरपरिषद शाळा क्र. २, तेल्हारा – ३२ इंची एलईडी टीव्ही देऊन मुलांच्या डिजिटल अध्यापनास मदत.
जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, उकळी बु. आणि मराठी प्राथमिक शाळा, सावळा, तालुका संग्रामपूर – लेखन साहित्याचे वाटप.
हा उपक्रम कुटुंबाच्या सामाजिक दायित्वाची जाणीव दर्शवतो आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे, रवींद्र खुमकर, शिवाजी पवार, वंदना व्यवहारे, शितल वाघमारे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास पोहरकर, प्रवीण पोहरकर, मंगेश गवई आणि पत्रकार पंकज भारसाकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे यांनी केले.
read also :https://ajinkyabharat.com/non-stick-bhandayamadhye-swayampak-kartay/
