अकोला : तेल्हारा तालुक्यातील भोकर गावातील विकासकामांवरून वादंग निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत काळेगावने गावात कोणतेही ठोस विकासकाम केले नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवक आघाडीचे उपाध्यक्ष गणेश महादेवराव तराळे यांनी केला आहे.गावात घरकुल, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत योजनांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामसेवकाने सर्व विकासकामांची माहिती व हालचाल रजिस्टर तात्काळ ग्रामस्थांसमोर सादर करावी, अशी मागणी तराळे यांनी केली.येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, तेल्हारा येथे उपोषण करण्याचा इशारा तराळे यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सामान्य गावकरी विकासापासून वंचित राहतात, हे अन्यायकारक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/banjara-dhangar-pudhe-aale-tar-kya-karanar/