तेल्हारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी

तेल्हारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी

तेल्हारा दि . तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक

अहिल्यादेवी होळकर उद्यान याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी

होळकर यांचे स्मारक उभारण्यात यावे व सोबत विविध मागणी सह आज श्री छत्रपती प्रतिष्ठान तेल्हारा

Related News

यांच्या वतीने तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे .

तेल्हारा शहरातील एकमेव विरंगुळा केंद्र व बगीच्या म्हणून हे उद्यान तयार होत आहे

ज्या महापुरुषांच्या नावाने हे उद्यान उभारण्यात आले आहे त्या महापुरुषांचे

स्मारक या उद्यान मध्ये असणे आवश्यक आहे .

राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरयांचे

जीवनकार्य महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद आहे . नवीन पिढीला त्याच्या दिव्य तेजस्वी असा

इतिहास जाण व्हावी या करिता तेल्हारा शहरातील निर्माण होत असलेले राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब

जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे भव्य दिव्य असे

स्मारक उभारण्यात यावे त्याच बरोबर या उद्यान मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवण्यात यावे .

तसेच या उद्यान मध्ये येणाऱ्या महिला ,लहान मुले ,जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी

सी सी टी व्ही कॅमेराची सुद्धा नितांत आवश्यकता आहे .

अश्या विविध मागणीचे निवेदन आज छत्रपती प्रतिष्ठान याच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे

यावेळी प्रा सचिन थाटे ,गजानन गायकवाड , प्रदीप ,गौरव धुळे , स्वप्नील सुरे उपस्थित होते .

Read more news here :
https://ajinkyabharat.com/mumbai-based-luxurious-house-each-mahinayat-2-kotchi-earnings-hitman-rohit-sharma-networth/

 

Related News