तेल्हारा (अकोला) – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे अनुदान अद्याप मिळालं नाही,
याच्या निषेधार्थ तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
गेल्या वर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
आज सकाळपासून तहसील कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“जोपर्यंत अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,”
असा इशारा सुनील इंगळे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा यांनी दिला.
आंदोलनाच्या ठळक बाबी :
-
मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान
-
शासनाकडून अनुदान जाहीर, पण अद्याप प्रत्यक्ष रक्कम जमा नाही
-
शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे जमा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार
-
तहसील प्रशासनासमोर मोठा दबाव निर्माण
सुनील इंगळे म्हणाले,
“शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली, पंचनामाही झाला, पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नाहीत.
शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे हे अनुदान तत्काळ मिळणं गरजेचं आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू.”
या आंदोलनात तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काही महिलाही उपस्थित होत्या. दरम्यान, तहसील कार्यालयाने यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचे संकेत दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/sri-guru-shivaling/