“तेल्हारा: संत तुकाराम महाराज चौकात वाहतुक नियंत्रण चौकी उभारण्याची मागणी”

"तेल्हारा: संत तुकाराम महाराज चौकात वाहतुक नियंत्रण चौकी उभारण्याची मागणी"

तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर स्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे शहर वाहतूक

नियंत्रक पोलीस चौकी उभारण्याची मागणी शांतता समिती तेल्हारा

यांच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना केली आहे.

Related News

तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक हा परिसर शहरातील मुख्य रहदारी मार्ग आहे.

याच ठिकाणी मुख्य प्राथमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालये असून, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच परिसरात शहरातील

बस स्थानकाला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

यावर विचार करत शांतता समिती तेल्हाराने याठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीची

तातडीने उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या वेळी शांतता समितीचे

सर्व सदस्य उपस्थित होते आणि याबाबत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/eknath-shindecha-moim-fate-thackeray-gatala-motha-danka/

Related News