तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर व्यवसायिकांचे आमरण उपोषण

तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर व्यवसायिकांचे आमरण उपोषण

तेल्हारा  – नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराच्या विरोधात व्यवसायिक नरेंद्र सुईवाल यांनी ८ सप्टेंबर २०२५ पासून तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे आपली तक्रार मांडली, मात्र अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर उपोषणास धाडस केले आहे.सुईवाल यांच्यासह इतर व्यवसायिकांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. तसेच जीपीएसद्वारे फोटो पुरावेही सादर केले होते. यावर २१ फेब्रुवारी २०२५ रोजीही संबंधित साक्ष्य पोलिसांना सादर करण्यात आले होते. २९ जून आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी स्मरणपत्राद्वारे जिल्हाधिकारी अकोला यांच्यासमोर व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात निवेदन दिले गेले. तथापि, मुख्याधिकारी गावंडे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही.सुईवाल यांनी ठामपणे म्हटले आहे की, त्यांच्या तक्रारीचे निवारण न झाल्यास व आमरण उपोषणात गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. याशिवाय, प्रशासनाकडून पोलीस संरक्षण व परवानगी देण्याची मागणी केली आहे.त्यांनी या उपोषणाद्वारे प्रशासनाकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत नागरिकांच्या हितासाठी संघर्षाचे पाउल उचलले आहे. नागरिकांमध्ये नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध चिंता व असंतोष वाढत असून स्थानिक योजनेचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले नाहीत, असा आरोपही सत्ताधारी प्रशासनावर केला जात आहे.उद्योगधंद्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत सुईवाल यांनी प्रशासनाकडून त्वरित न्याय दिला जावा अशी विनंती केली आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/palghar-ascend/