तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित ची सत्ता.! सभापती पदी वं ब आ चे श्याम भोंगे यांची निवड.!

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित ची सत्ता.!

एड. बाळासाहेब आंबेडकरांनी दिली धनगर समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी.!

अकोला: अकोला जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती यांची

निवडणूक आज झाली या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी

श्याम भोंगे यांची तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून अविरोध निवड झाली तर उपसभापती म्हणून

शेतकरी पॅनलचे हरिदास वाघ यांची अविरोध निवड झाली संपूर्ण विदर्भामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आतापर्यंत ही धनगर समाजाला

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती म्हणून कोणत्याच पक्षांनी आघाड्यांनी संधी दिली नव्हती एड. बाळासाहेब आंबेडकर

यांनी श्याम भोंगे यांच्या माध्यमातून तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती करून धनगर समाजाला

सहकार क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची या माध्यमातून संदीप दिली त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन

आघाडी च्या कार्यकर्त्यांमध्ये व धनगर समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे आज सभापती म्हणून निवड झाल्यानंतर श्याम भोंगे यांचे

जंगी स्वागत करून तेल्हारा मध्ये मिरवणूक काढण्यात आली या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा

महासचिव मिलिंद इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते तर तालुकाध्यक्ष अशोक दारोकार माजी सभापती सुनील इंगळे,

संचालक मोहन पात्रीकर, गोपाल कोल्हे,श्रीकृष्ण जुमडे, सुमित गवारगुरु, संदीप गवई, श्रीकृष्ण वैतकार, रवि भाऊ भिसे,

जीवन बोदडे, पंजाब तायडे, बाबूजी खोब्रागडे, मधुसूदन बरिंगे, रतन दांडगे, इद्रिस भाई, इत्यादी उपस्थित होते.

यावेळी सभापती म्हणून निवड झालेल्या श्याम भोंगे यांनी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे विदर्भात

पहिली वेळ सहकार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून धनगर समाजाला प्रतिनिधित्व

दिल्याबद्दल ऍड. बाळासाहेब आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर यांचे आभार मानले.

श्याम भोंगे यांचे वडील किसनराव भोंगे हे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षापासून सहकारी असून

सुरुवातीच्या 1986 च्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चे तेल्हारा तालुक्याचे अध्यक्ष होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/sontke-plotmadhyay-panic-pasarvanya/