मोहम्मद शमीला 26 महिन्यानंतर टी20 संघात सहभागी करण्यात आलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सघात घेतल्याने आता मैदानात गोलंदाजी कधी करणार
याची उत्सुकता आहे. असं असताना त्याला टी20 प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणं
Related News
कठीण झाल आहे. एका रिपोर्टनुसार, शमीची टी20 फॉर्मेट टीम इंडियाला गरज नाही.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मोहम्मद शमी मैदानापासून दूर आहे.
त्याचं संघात कमबॅक होणार की नाही याबाबत मागच्या दिवसात चर्चा रंगल्या होत्या.
आधी कसोटीत खेळणार की नाही अशी चर्चा होती. मात्र पूर्णपणे बरा
मोहम्मद शमी टी20 मालिकेसाठी जोरदार नेट प्रॅक्टिस करत आहे.
पण यावेळी त्याच्या पायाला पट्टी बांधल्याचं दिसून आलं.
त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. चाहत्यांच्या मते, मोहम्मद शमी अजूनही
दुखापतीतून सावरलेला नाही. दुसरीकडे, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमुळे
या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. मोहम्मद शमी 26 महिन्यानंतर टी20 फॉर्मेटमध्ये परतला आहे.
दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप 2023 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
मोहम्मद शमीने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 24 विकेट घेत चांगली कामगिरी केली होती.
त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याच्या डाव्या पायाला सूज आली होती.
त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळत त्याने फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/tivasa-yethil-shetkari-subhash-sharma-yana-padma-shri-award-shetitle-contribution-national-pride/