भारत आणि पाकिस्तानचा सामना सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा होणार आहे. फायनलच्या मार्गावर हा सामना अत्यंत महत्वाचा असून, दोन्ही संघांची टक्कर जोरदार असेल.
सध्याच्या अंदाजानुसार, भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मागील सामन्यापेक्षा दोन बदल होण्याची शक्यता आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा खेळले होते. मात्र पाकिस्तानविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांचा परतावा अपेक्षित आहे, ज्यामुळे अर्शदीप आणि हर्षित टीममध्ये राहणार नाहीत.
भारताचा संभाव्य प्लेइंग 11:
अभिषेक शर्मा
शुभमन गिल
सूर्यकुमार यादव (कर्णधार)
तिलक वर्मा
संजू सॅमसन
हार्दिक पंड्या
शिवम दुबे
अक्षर पटेल
वरुण चक्रवर्ती
कुलदीप यादव
जसप्रीत बुमराह
डावात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सुरूवात करतील, सूर्यकुमार यादव फर्स्ट डाउनसाठी येईल, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल क्रमवारीने खेळतील. गोलंदाजी युनिटमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव असेल, तर जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची मुख्य ताकद ठरेल. अष्टपैलू पंड्या आणि दुबे यांची साथही मिळेल.
या सामन्यात भारताचा संघ पुन्हा एकदा संपूर्ण सामर्थ्याने उतरून पाकिस्तानविरुद्ध जोरदार लढाई देईल.
read also :https://ajinkyabharat.com/2025-hai-bestseller-car/
