दुबई :आशिया कप 2025 स्पर्धेतील गट फेरी संपल्यानंतर आता सुपर 4 साठीचे 4 संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एकूण 11 सामन्यांनंतर सुपर 4 साठीचं चित्र स्पष्ट झालं.
गुरुवारी (18 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला आणि सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केला. या निकालानंतर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडले तर बांगलादेशला सुपर 4 मध्ये स्थान मिळालं. अशा प्रकारे ए ग्रुपमधून भारत (A1), पाकिस्तान (A2) तर बी ग्रुपमधून श्रीलंका (B1) आणि बांगलादेश (B2) पात्र ठरले आहेत.
सुपर 4 मधील सामने
20 सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – दुबई
21 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
23 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – अबुधाबी
24 सप्टेंबर : भारत विरुद्ध बांगलादेश – दुबई
25 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – दुबई
26 सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका – दुबई
28 सप्टेंबर : अंतिम सामना – दुबई