शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांच्या हस्ते सन्मानित

प्रगती होळकर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

 तालुकास्तरीय स्पर्धेत ग्रामीण भागातील अ गटात उत्कृष्ट कामगिरी; 

बोरगाव मंजू :तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत परशुराम नाईक विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रगती होळकरने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक प्राप्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र इंग्लिश टीचर्स असोसिएशन अकोला, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद अकोला आणि श्री शिवाजी हायस्कूल टाऊन ब्रांच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा खूपच प्रतिस्पर्धात्मक आणि उत्साहवर्धक ठरली.या स्पर्धेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे  प्रगती होळकरने ग्रामीण भागातील अ गटात आपली कर्तृत्वाची छाप सोडली. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.अरविंद मोहरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमात प्रा.अमोल जती, प्रा. गोपाल दशमुखे आणि इतर मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी डी. बी. म्हैसणे, मनोज देशमुख, सुनील अवचार, गणेश राऊत व श्रीमती वैशाली अवचार हे मान्यवरही उपस्थित होते.

सन्मानित करताना प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि मेडल

प्रगती होळकर यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. अरविंद मोहरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या परिश्रमाची आणि बुद्धिमत्तेची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. प्रगतीने आपले यश हे आपल्या शाळेच्या प्रमुखाध्यापक श्री मनोज आगरकर, उपमुख्याध्यापक  गजानन पोहनकर, पर्यवेक्षक  शंकर भडे,  गोपाल मालवे, संदीप मनवर यांच्यासह वर्ग शिक्षिका कु. किरण मेंगे व  माधुरी दिपके यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे साध्य केले असल्याचे नमूद केले.

 भावी आशादायक विद्यार्थिनी

परशुराम नाईक विद्यालयाच्या या हुशार विद्यार्थिनीचे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. प्रगतीच्या यशामुळे शालेय विद्यार्थ्यांना नव्या प्रेरणेची चालना मिळाली असून, शैक्षणिक स्पर्धेत सक्रीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आगामी काळातही अशी कामगिरी सुरू राहावी, अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन व स्थानिक समाज व्यक्त करत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/akot-adgaon-bu-marg-khadyani-banala-jeevaghena/