अकोला,
देशभक्त आजी-माजीसैनिक सेवाभावी संस्था अकोला व तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने शनिवारी (दि. 26)
कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे देशासाठी विविध युद्धामध्ये आपले प्राण त्यागणाऱ्या
शहिदांना जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली व मानवंदना देण्यात येणार आहे.
यासाठी गेल्या 3 वर्षेपासून प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे
अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांच्या सूचनेनुसार सामाजिक क्षेत्रात विविध सेवाभावी उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी नेहमीच सामाजिक व धार्मिक आणि देशाभक्तीतही तत्पर आहे.
गेल्या 3 वर्षेपासून 26 जुलै ला कारगिल विजय दिन म्हणून साजरा होत असताना संस्थेने माजी सैनिकांच्या देशभक्त
आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण यांच्या सहकार्याने तिल्ह्यातील सर्व विरशहीद जवानांचा परिवार,
ज्यामध्ये वीरमाता, वीर पिता, वीर पत्नी, वीर पुत्र अशा विविध नात्यातील सदस्यांचा सत्कार करीत आहे.
देशभक्त आजी-माजीसैनिक सेवाभावी संस्था अकोला व तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
सैनिकांची मोटर सायकल रॅलीचेही आयोजन असून या रॅलीला अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
आणि प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष
डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत मेजर डॉ.मनोहर चव्हाण,
व तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी चे सचिव विष्णुदास मोडोकार यांनी दिली.
कार्यक्रमात सैनिक परिवार व सर्व गरजूना विविध सुविधा देण्याकरिता मेडिकल कॅम्प, डेंटल कॅम्प, डोळ्याचे तज्ञ,
स्त्री रोग तज्ञ, विधीतज्ञ ,असे विविध प्रकारचे कॅम्प या कार्यक्रमात लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व देशभक्त नागरिकांनी
वीर शहिदांना मानवंदना देण्याकरिता व शहीद परिवारांना सन्मान देण्याकरिता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष व संस्थापक
देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला महाराष्ट्र,चे माजी सैनिक डॉ. मनोहर गोकुळ चव्हाण यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर, शहीदपुत्र दिपक पातोंड,माजी सैनिक दिपक गाडगे,
माजी सैनिक गोपाल पवार, माजी सैनिक विठ्ठल इंगळे, यांची उपस्थिती होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/breaking-barsheetaki-cage/