लोणार : तालुक्यातील तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था गंभीर आहे. शाळेतील इमारत पडझडीत आहे, भिंतींना तढे गेले आहेत, पत्रे कोसळण्याचा धोका आहे आणि पावसाळ्यात खोल्यांमध्ये पाणी गळते. यामुळे विद्यार्थी असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत.शाळेत तीन खोल्या आहेत, पण केवळ दोनच खुल्या असल्याने पाच वर्गांचे विद्यार्थी फक्त दोन खोल्यांमध्ये बसविले जात आहेत. शिक्षकांची संख्या कमतर असल्यामुळे तीन शिक्षकांना पाच वर्ग शिकवावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही.शाळेत पिण्याचे पाणी नाही, शौचालय अपुरा व नादुरुस्त आहे, किचन शेड पावसाळ्यात गळतो आणि विद्युत पुरवठा अपुरा आहे. शाळेचा कंपाउंड कमी उंचीचा असल्यामुळे सुरक्षा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे पालक अनेकदा आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवतात.शाळा समितीने ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे अनेकदा दुरुस्तीची मागणी केली, तरी प्रशासनाकडून लवकर उपाय नाही. शाळा समिती अध्यक्ष संतोष खादंरकर, तांटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आटोळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे आणि इतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे, ज्यात शाळेच्या भौतिक सुविधांसाठी तातडीने मदत करण्याची मागणी आहे.
read also : https://ajinkyabharat.com/risod-police-stationer-plantation/