इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
उंबर्डा येथील मुख्याध्यापक दानिश इकबाल अजिमोद्दीन यांचा प्रेरणादायी कार्यासाठी ‘पोस्ट ऑफ द मंथ’ या विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी
‘पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार दरमहा दिला जातो.
यंदाचा मान इंझोरी केंद्रातील दानिश इकबाल यांना मिळाल्याने त्यांच्या कार्याची पावतीच मानली जात आहे.
कार्यक्रमात FLN (Foundational Literacy & Numeracy), अध्ययन निष्पत्ती, शिष्यवृत्ती सराव परीक्षा,
आणि महावाचन या महत्त्वपूर्ण उपक्रमांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक, शाळा आणि केंद्रप्रमुख यांचाही गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“शिक्षकांचे समर्पित कार्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरते.
ज्ञानदान हे एक पवित्र कार्य असून, ते अधिक निष्ठेने आणि समर्पणाने करणे ही काळाची गरज आहे.”
या प्रेरणादायी सोहळ्यात ओपन लिंक्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी रघुनाथ वानखडे, विजय वावगे यांच्यासह
जिल्ह्यातील विविध शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा संचार केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/churchgate-sthankabaher-best-basla-fire/