महान:- ५ सप्टेंबर वार गुरुवार रोजी बाल शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल महान येथे मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम स्कुल च्या मुख्याध्यापिका कु.सपना सुपनेर यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करुण हार अर्पण करण्यात आले.
स्कूल मधिल इयत्ता ६ वी ते ८चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून सर्वा ना आनंद वाटत होता.
सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शाळेच्या समोर पटांगणात जमले होते शिक्षक दिना निमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नर्सरी,केजी वन,केजी टू च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निमित्त छान रंगिबेरंगी ग्रिटिंग कार्ड,बुके, बनवून आनली होती.वर्ग १ये ४ पर्यंत त च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि ५ ते ८ पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा चे आयोजीत करण्यात आली होती.
या मध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अनेक विद्यार्थ्यांनी स्पिच पोयम चे सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुण आपल्या जिवनातील शिक्षकाचे महत्त्व विशद केले शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व शिक्षकाचे आभार मानले शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.इफरा,अश्मिरा यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.बोळे टिंचर यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
Also Read: https://ajinkyabharat.com/shaktipeeth-highway-projects-land-acquisition-process-canceled/