शिक्षक दिनाचा अनोखा सोहळा !

विद्यार्थ्यांनी घेतली गुरुजींची जागा

बाळापूर : जि. प. शाळा तामशी येथे ६ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवस गुरुजी होण्याचा आनंद घेतला. आपल्या मित्रांना शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावरील भाषण सादर करून आदर व्यक्त केला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख माधव काळे यांनी भूषवले. शाळेतील शिक्षक गजानन चिंचोलकर, केशव घाटोळ, किशोर श्रीनाथ बहादुरकर, कविता ठेंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन केशव घाटोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ठोसर यांनी मानले.शिक्षक व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

read also : https://ajinkyabharat.com/jana-sanghchaya-karyakarpasoon-deshche-vice-president/