शिक्षक दिनी परशुराम नाईक विद्यालयाचा अभिनव उपक्रम

‘उत्कृष्ट शिक्षक २०२५’ पुरस्कार

 बोरगाव मंजू – परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यालयासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकाचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोहनकर हे अनेक वर्षांपासून इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशी महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे.शाळेच्या संचालक मंडळाने त्यांच्या आत्मीय कार्यपद्धती, विद्यार्थ्यांप्रती असलेली जिव्हाळा व योगदान लक्षात घेऊन यावर्षीचा “उत्कृष्ट शिक्षक २०२५” हा पुरस्कार देऊन सन्मान केला. तसेच इतर सर्व शिक्षकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण नाईक, सदस्य बोरगावकर, श्याम देशमुख, सचिव नाजूकराव गमे, के. एम. जोशी, सुधाकरराव टोबरे, प्राचार्य मनोज आगरकर, पर्यवेक्षक श्री भदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पजई यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश भड यांनी मानले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/kandi-bazar-poisana-kay-sapadal-maheet/