“तळ्यावर काय घडलं? जळगावात 29 वर्षीय तरुणाचा धक्कादायक मृत्यू”

जीभ कापलेला तरुणाचा मृतदेह

जळगाव – शहरातील मेहरून तलावाजवळ एका भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. बिलाल चौकातील 29 वर्षीय शेख अबुजर शेख युनूस हे तरुण 18 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांच्या मृतदेहाचा मेहरून तलावाजवळा सापडला.मृतदेहाचा शोध लागल्यावर सर्वत्र घाबरट वातावरण निर्माण झाले. अधिक भीषण गोष्ट म्हणजे, मृतदेहाच्या जीभ कापलेली आढळली आहे, ज्यामुळे या घटनेत घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतकाचे काका शेख अमीन शेख करीम यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवून, घटनेमागील कारण शोधावे आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.घटनास्थळी पोलीस तपास करत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आता या प्रकरणात घातपाताचा पैलू तपासत आहेत आणि घटनेमागील सत्य शोधण्यास पुढे काम करत आहेत.परिसरातील नागरिक मात्र या घटनेमुळे चिंतेत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/sanjay-gaikwadanche-nivdnuk-khabat-decided-statement/

Related News