टाटा मोटर्सवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला असून कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. या हल्ल्याचा थेट परिणाम कंपनीच्या सब्सिडियरी **जॅग्युअर लँड रोव्हर (JLR) वर झाला असून, इंग्लंडमध्ये वेस्ट मिडलँड्स आणि मर्सिसाइड कारखान्यांमधील उत्पादन थांबवण्यात आलं आहे.ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जेएलआरच्या संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी केली गेली, ज्यामुळे कारखान्यांमध्ये दररोज होणारे सुमारे 1000 वाहनांचे उत्पादन थांबले. सायबर हल्ल्यामुळे कर्मचारी, डीलर्स आणि ग्राहक सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे. 33 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर याचा थेट परिणाम झाला असून, डीलर्सकडे कार रजिस्ट्रेशन सुविधा, स्पेयर पार्ट्स ऑर्डर करण्याचा पर्याय आणि डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर उपलब्ध नाही.सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जेएलआरला सायबर विमा संरक्षण नाही, आणि इन्शुरन्स घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच हा हल्ला झाला. परिणामी, संपूर्ण आर्थिक नुकसान कंपनीला स्वतः भरणं लागणार आहे. या हल्ल्याचा टाटा मोटर्सच्या बॅलन्स शीट आणि गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होईल. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक डेटावर सुद्धा याचा परिणाम झाला असून, डेटा सुरक्षा आणि कंपनीच्या आयटी प्रणालींचा मोठा धोका अधोरेखित झाला आहे. टाटा मोटर्सच्या प्रशासनाने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, भविष्यात अशा हल्ल्यापासून बचावासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
read also:https://ajinkyabharat.com/delhikal-college-scandal/
