तनुश्री दत्ताकडून बॉलिवूड माफियांवर धक्कादायक आरोप

"आमच्या फार्महाऊसवर आल्याशिवाय तू हिरोईन…"

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील माफियांचे काळे कारनामे उघड करत धक्कादायक खुलासे केले आहेत. तनुश्रीच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा इंडस्ट्रीतील काळं सत्य समोर आलं आहे.

‘आशिक बनाया आपने’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत इंडस्ट्रीतील अन्याय व काळं जग उघड करताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूड माफियांवर जोरदार टीका केली.

तनुश्री म्हणाली, “आमचे तळवे चाटल्याशिवाय तुला यश मिळेल… आमच्या फार्महाऊसवर आली नाहीस तरी कशी हिरोईन झालीस… बॉलिवूडमध्ये हिरोईनचा दर्जा तुला कोणी दिला… आमच्या शिफारसीनुसार तुला हिरोईन कोणी केलं… ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती.”

तिने पुढे सुशांत सिंह राजपूतचा संदर्भ देत म्हटलं, “अनेकांना माझं यश पाहिलं गेलं नाही. सुशांतचं यशही कोणाला रुचलं नाही. हे सर्व काही बॉलिवूड माफियांसाठी आणि त्यांच्या बेकायदेशीर बापांसाठी आहे. आता त्यांनी त्यांच्या कर्माचा विचार केला पाहिजे.”

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तनुश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘36 चायना टाऊन’, ‘भागम भाग’, ‘रिस्क’ अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या. तसेच 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर कॉप्स वर्सेस सुपर विलन्स’ मालिकेतही ती दिसली होती.

2018 मध्ये भारतात सुरु झालेल्या MeToo मोहिमेत तनुश्री अग्रस्थानी होती. तिने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे ती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती.

read also :https://ajinkyabharat.com/united-nations-baloch-liberation-army-sawal-proposal-canceled/