तलाठी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणच नाही?

तलाठी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणच नाही?

वाडेगावात स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणच नाही?

शासनाच्या आदेशाला केराची टोपली; मंडळ अधिकारी व तलाठी गैरहजर, नागरिकांत संताप

 भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२४ या तीन दिवसांदरम्यान सर्व

शासकीय कार्यालयांत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करणे बंधनकारक होते.

या संदर्भातील परिपत्रक महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांना देण्यात आले होते.

मात्र वाडेगाव येथील महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयात हा आदेश धाब्यावर बसवण्यात आला.

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला गेला नाही, असे वास्तव समोर आले आहे.

स्वातंत्र्यदिन हा देशाचा सर्वोच्च उत्सव असताना वाडेगावातील मंडळ अधिकारी चंद्रकांत बोळे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमालाच गैरहजेरी लावली.

बोळे हे वाडेगाव येथे निवासी मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी गावात वास्तव्यास राहत नाहीत.

एखादी अनुचित घटना घडली तर जबाबदारी कोतवालावर ढकलण्यात येते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळते.


तलाठीही अनुपस्थित

फक्त मंडळ अधिकारीच नव्हे तर महिला तलाठी लोकमुद्रा कुठोळे देखील १५ ऑगस्टला कुठेच दिसल्या नाहीत.

त्यामुळे “राष्ट्रीय सणासारख्या पवित्र दिवशी हे अधिकारी नेमके कुठे होते?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.


कोण होते उपस्थित?

अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण सोहळ्यास केवळ

  • शैलेश इंगळे (पटवारी)

  • रबडे (पटवारी)

  • नारायण मानकर (कोतवाल)

हे तिघेच हजर होते. महसूल विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली.


ग्रामस्थांचा सवाल

ग्रामस्थांचा संताप व्यक्त करताना म्हणाले –

“जेव्हा शासनाने स्पष्ट आदेश काढले होते, तेव्हा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची अनुपस्थिती गंभीर आहे.

स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाचे महत्त्व यांना नाही का? अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही?”

READ ALSO :https://ajinkyabharat.com/wp-admin/post-new.php