करूर चेंगराचेंगरीत 39 जणांचा बळी
तामिळनाडू – करूर येथील टीव्हीके पक्षाच्या रॅलीदरम्यान शनिवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत तब्बल 39 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त केली गेली आहे.अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी या घटनेनंतर आपल्या X हँडलवर भावनिक पोस्ट शेअर केली. विजयने लिहिले, “काल करूरमध्ये जे काही घडलं, त्याचा विचार जरी केला तरी माझं मन वेदनेनं भरून जातं. मी ज्यांना काल भेटलो, त्यांच्या चेहऱ्यांची आठवण मला सतत येते आहे. माझ्या डोळ्यांसमोर सतत त्या लोकांचे चेहरे फिरतायत. मी देवाकडे प्रार्थना करतो की जखमी लवकरात लवकर बरे होऊन आपल्या घरी परत जावेत.”विजय यांनी आश्वासन दिलं की टीव्हीके पक्षाकडून सर्व जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली जाईल.
सरकारकडून आर्थिक मदत
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
गुन्हा नोंदवला
या घटनेसंदर्भात पोलिसांनी टीव्हीकेचे करूर वेस्ट जिल्हा सचिव व्ही. पी. मथियाझागन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीसाठी न्यायाधीश घटनास्थळी
तामिळनाडू सरकारने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अरुणा जगदीसन यांना करूर घटनास्थळी चौकशीसाठी नेमले.
कलाकारांनी व्यक्त केली शोक
अभिनेता कमल हासन आणि विशाल यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले. विशाल यांनी पोस्टमध्ये मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याची जबाबदारी टीव्हीके पक्षानं घ्यायला हवी, अशी मागणी केली.
read also : https://ajinkyabharat.com/mithun-manhas-bcci-became-president/
