स्वयंशासन कार्यक्रमात चमकले श्री गुरुदेव विद्या मंदिराचे विद्यार्थी!

कार्यक्रमात

अकोट : बोर्डी येथील श्री गुरुदेव विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा

अकोट : बोर्डी येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी स्वयंशासन कार्यक्रम स्फूर्तीने सादर केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत कार्यक्रमाला वेगळेच रंगत आणली.शाळेचे मुख्याध्यापक राठोड सरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापकांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पाटील सर, जयस्वाल सर व बद्रे मॅडम उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.स्वयंशासन कार्यक्रमात आचल मानकर, नंदिनी नेवारे, वैभवी कोलखेडे, पायल कुमरे, निकिता मोहिते, रिया महाले, सिद्धी महाले, प्रतीक्षा मासोदकर, रोहीन लोनकर, ललिता पडघान, नूतन बागडे, नमन भलावी, परिमल कसुरकार, संकेत वनकर आदी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल महाले सर, हरीभाऊ शिवरकार व रवी कुरोई यांनी विशेष प्रयत्न केले.

read also : https://ajinkyabharat.com/bhakti-enthusiasm-calm-nandapurcha-ganeshotsav-yashasvi/