स्वाती शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

प्राइड ऑफ महाराष्ट्र च्या मानकरी

अंकिता मंत्री यांना राज्यस्तरीय प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार

अकोला : अकोला येथील  प्रसिद्ध मेकअप, हेअर आणि ब्युटी आर्टिस्ट अंकिता गिरीश मंत्री यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र – ब्युटी पेजंट या कार्यक्रमात विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पूनम प्रॉडक्शन तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गेल्या वीस वर्षांपासून ब्युटी क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंकिता मंत्री यांच्या कार्याची दखल घेत हा विशेष सन्मान करण्यात आला. त्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असून स्किन, हेअर केअर आणि ब्युटी क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.स्वाती शर्मा यांना तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेत ‘चकोरी’ या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली आहे. सध्या त्या स्टार भारत आणि सोनी वाहिनीवरील मालिकांमध्ये काम करत आहेत.

पुरस्काराबद्दल बोलताना अंकिता मंत्री म्हणाल्या,

 “माझ्या कलेची दखल घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. विशेषत: स्वाती शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान माझ्या कार्याला अधिक प्रेरणादायी ठरणार आहे.”या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. अंकिता मंत्री यांनी यापूर्वीही विविध पुरस्कार मिळवून आपल्या कामाची छाप पाडली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/kantara-chapter-1cha-trailer-displayed/