अकोट – तालुक्यातील गट ग्रामपंचायत करतवाडी (आ) अंतर्गत येणाऱ्या मौजे ढगा गावामध्ये 28 सप्टेंबरच्या रात्री 09:30 वाजता संदीप अशोक इंगळे यांच्या गोठ्यात गाय बांधली होती. सततच्या संततधार पावसामुळे गोठा कुडामातीचा शिकस्त असलेला कवेलूसह गाईच्या अंगावर कोसळला. गाय खुट्याला बांधली असल्यामुळे पळ काढता आले नाही आणि तिथेच जखमी अवस्थेत पडून तिचा मृत्यू झाला. यामध्ये संदीप इंगळे यांचे घरासह गाईचे सुद्धा नुकसान झाले. गाईची अंदाजे नुकसानभरपाई 45,000 रुपये आणि कवेलू/विटा मातीची कच्ची भिंत अंदाजे 5,000 रुपये; एकूण अंदाजे 50,000 रुपयांचा पंचनामा ग्राम विकास अधिकारी राजेंद्र राऊत व ढगा ग्राम महसूल अधिकारी सविता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पंचानाम्यात मौजे ढगा येथील पोलीस पाटील सौ संगीता रामदास इंगळे, विशाल सुभाष आग्रे, संदीप अशोक इंगळे, सुरेश मोहन वानखडे, जगदेव सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते. शेतकरी संदीप इंगळे यांनी सांगितले की, “सततच्या पावसामुळे झालेला नुकसानभरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी.” ही घटना पिकांसह प्राण्यांच्या सुरक्षिततेवर पावसामुळे होणाऱ्या धोका अधोरेखित करते आणि स्थानिक प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करते.
सततच्या पावसामुळे गाय मृत्यू

29
Sep