मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे.
मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
माहिती आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गावात
कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार
आणि ड्रोनने बॉम्ब हल्ला केला असून अचानक झालेल्या या
हल्ल्यामुळे दहशत पसरली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची
पळापळ झाली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून
9 जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक
परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. कोत्रुक गावच्या पंचायत
अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास
सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी गावातील स्वयंसेवक
संवेदनशील भागात नव्हते. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे
अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाले
तेव्हा गावकरी आपापल्या घरात होते. या हल्ल्याबाबत मणिपूर पोलिसांनी
दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. कुकी अतिरेक्यांनी हायटेक
ड्रोनचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अशा ड्रोनचा वापर फक्त
युद्धातच होतो. या ड्रोनद्वारे हल्ला करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि तांत्रिक
तज्ञ असणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेत मोठे षडयंत्र असण्याची
शक्यता नाकारता येत नाही,असा दावा पोलिसांनी केलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/maharajas-effigy-was-not-broken-or-broken-in-malvan-sanjay-raut/